ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही व्यक्तीशी किंवा माझ्याशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.
____________________________________________________
आता हा काय प्रश्न झाला??? एवढ्या प्रेमाने कॉल केला ... त्यात हिला कसली चिंता की मी काही विसरलो का?? वाटले उत्तर द्यावे की विसरलो नाही पण मिस करतोय... नंतर सकाळचे उद्योग आठवले आणि गप्प झालो...
"सहज केला होता... चल तुझ्याशी नंतर बोलतो." आणि फोन ठेवला.
अजूनही मी माझ्या सकाळच्या धुंदीतुन बाहेर आलो नव्हतो. अर्णवला पिंग केले आणि बोललो की चल चहाला जाऊ. आम्ही दोघे कॅंटीन मध्ये आलो.
आता तिचा कॉल आला....
"अहो, तुम्ही ठीक आहात ना??"
"हो ग.. मी तर ठीक आहे... असे का विचारतेस???"
"नाही... सकाळीपण तुमचे वागणे थोडे वेगळे होते.. आताही कॉल केला आणि काहीच बोलले नाहीत. म्हणून विचारले..."
तिचेही बरोबर होते. मी असा वेंधळ्यासारखा वागायला लागलो तर कोणालाही शंका येणारच ना... आणि ती तर बायको होती. माझे दररोजचे वागणे बघत होती. अचानक बदल दिसल्यावर कोणीही असे विचारणारच...
"अग.. तसे काही नाही आहे.. तू काही त्रास करून घेऊ नकोस..."
"ठीक आहे... संध्याकाळी घरी केव्हा येणार???"
हा एक त्रास तर प्रत्येक लग्न झालेल्या माणसाला होतो. संध्याकाळी केव्हा येणार... प्रश्नपण तेच विचारतात आणि प्रश्नातच उत्तर ही टाकतात.
"येतो... काम संपले की... ६ च्या आसपास..."
असे बोलून मी फोन ठेवला... अर्णवला म्हटलो की आज सर्व काम ६च्या आत उरकयला हवे... नाहीतर परत संध्याकाळी फोन येईल. बेचैनीतच चहा संपवला आणि आम्ही वर निघालो. प्रभाच्या डेस्कवर गेल्या गेल्या तोंड उघडले आणि बोललो की संध्याकाळी आपल्याला राउतला जायचे आहे. तेव्हा अर्णवने असे बघितले जणू काही मी तिला डेटवर घेऊन जातोय आणि का नाही बघणार... कारण राउत एक हॉटेलचे नाव आहे आणि त्याच्यासमोरच मी त्याच्या वहिनीला घरी येण्याची वेळ सांगितली होती. आज माझ्याकडून बर्याच गोष्टी घडत होत्या...
दुपारी ४ला मी क्यूबिकलच्या बाहेर डोकवून बघितले तर नेहमीप्रमाणे अर्णव प्रभाच्या डेस्कवर टाइमपास करत होता. परत डोके खाली घातले. आता प्रभाला निघायला सांगायचे होते पण सांगू कसे?? तो अर्णव तर तिला सोडायला तयारच नव्हता.
मोबाइल उचलला आणि प्रभाला निघायचा मेसेज पाठवला. निरोप तर पोहोचला होता, पण तो अर्णवला ही समजला. तो माझ्यजवळ आला आणि विचारले...
"तू मला सांगणार आहेस ... हे काय चालू आहे ते???"
"चहा पीणार??"
"तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे आधी..."
"अरे असे तडकाफडकी नको...थोडे शांतीला पकड... चल चहा पीऊ..."
आता मात्र गोची झाली होती. याला काहीतरी पट्टी पढवावी लागणार होती... जास्त कठीण पण नव्हते.. तरी ही....थोडा वेळ त्याला समजवले... तो मानला... तरीही अजुन एकदा म्हटलो...
"प्लीस मैत्री निभव...."
"पक्की निभवेन...."
हे वाक्य दुहेरी होते. कोणता अर्थ घ्यावा ते समजले नाही.... पण मला ही विचार करायला वेळ नव्हता. मी प्रभा ला घेऊन निघालो... तिने विचारले कुठे जायचे आहे??
"अग... आज हिच्यासाठी काहीतरी घेऊ म्हणतोय... आता तुझ्याशिवाय कोण जास्त समजणार तिला???".
"मग राउत का???"
"सहज... कॉफी प्याविसी वाटली तुझ्यासोबत म्हणून..."
तिने हे हसण्यावर नेले. ह्या मुलीपण ना पक्क्या शहाण्या असतात... मुलाचा मुख्य उद्देश हसण्यावर नेतात नेहमी....
पण ऑफीसमध्ये अर्णवने मैत्री निभावायची तयारी चालू केली होती. त्या साल्याने चक्क माझ्या घरी कॉल केला होता. आणि माझ्या बायकोला सांगितलेपण की मी प्रभासोबत बाहेर फिरायला गेलो आहे... माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. तिने त्याला उडवून लावले. पण त्या पठ्ठ्याने तिला प्रभाचा नंबर दिला आणि विचारायला सांगितले. आता मात्र तिच्या मनात थोडी भीती दाटायला सुरूवात झाली होती. तिची हिंमत होती नव्हती त्या नंबरवर कॉल करायला. पण तिचे मन स्वस्थही बसू देत नव्हते. सारखे सारखे तेच विचार येत होते मनात... हळू हळू त्या विचारांचे रुपांतर शंकेत व्हायला लागले होते. आणि का नाही होणार?? लग्नाला जेमतेम सहा महिने झाले होते आणि हे असे समजायला लागल्यावर एखादी स्त्री काय करणार??? ती पूर्णपणे बधीर झाली होती. तिला समजत नव्हते काय करावे. तरीही तिने हिंमत करून थरथरत्या हाताने फोन उचलला आणि अर्णवने दिलेल्या नंबरवर कॉल केला. इकडे प्रभाने नंबर बघितला अनोळखी होता. उचलला...
"हेलो.."
"हा..... हेलो.. हेलो.."
प्रभा इकडून हेलो हेलो करत होती...हिला समजत नव्हते की कसे विचारावे??... तेवढ्यात मी अजुन एक घोडचुक केली... फोन चालू असतानाच मी प्रभाला विचारले की स्नॅक्स काय घेणार?? तेवढ्यात फोन कट झाला होता..
इकडे तिने माझा आवाज ऐकला होता. तिला विश्वास बसत नव्हता. आता मात्र ती पूर्णपणे खचली होती. ती सारखी सारखी स्वतःला समजावत होती की कुणी दुसर्याचा आवाज होता... तरीही तिच्या मनात मोठा कलह माजला होता. शेवटी तिने ठरवले की जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत हे सर्व खोटे आहे. तिने अर्णवला कॉल केला आणि तिच्यासोबत राउतला यायला सांगितले. तो म्हटला की टॅक्सी घेऊन येतो. इमारतीच्या खाली आल्यावर मिस कॉल देतो. त्याप्रमाणे ते दोघे निघाले. आणि राऊतला पोहोचले. माझ्या मित्राने म्हटल्याप्रमाणे मैत्री निभावली होती.
इकडे मी स्टेजवर हातात माइक घेऊन काहीतरी बोलत होतो. तिने माझा आवाज ऐकला, आणि स्टेजकडे बघितले. आमच्या दोघांची नजरानजर झाली. तिचा चेहरा खूप सुजला होता. फक्त रडायची बाकी होती. मला माझी चुक समजली होती. तरीही मी माइक हातात घेतला आणि बोललो...
"अग.. इकडे ये..."
"मित्रहो... आत्ता मी जिच्याबद्दल बोलत होतो... ती ही आहे....”
तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला नीट समजत नव्हते... थोडीशी घाबरलेली, थोडीशी कावरीबावरी, थोडीशी आश्चर्यचकित... आणि खूप राग होता तिच्या चेहर्यावर.... ती स्टेजकडे येऊ लागली. जवळ आली... मी प्रभाला केक घेऊन यायला सांगितले...
आणि मी माईक हातात घेतला, एक पाय दुमडून गुडघ्यवार बसून बोललो..."मी तुझा खूप आभारी आहे ... माझ्या जीवनात आल्याबद्दल..."
ती अजुनही गोंधळलेली होती. पण आता चेहर्यावर फक्त आश्चर्याचे भाव होते. तिला समजत नव्हते की काय होत आहे.
"असे... अचानक.. मला काही समजत नाही आहे...."
"अग... आज पहिले वर्ष पूर्ण झाले तुला पहिल्यांदा बघायला.. म्हणजेच तू माझ्या जीवनात यायला एक वर्ष पूर्ण झाले...."
आता मात्र ती तिचे आसू थांबवु नाही शकली... माझ्या छातीवर डोके ठेऊन अक्षरशः रडायला लागली.... मी तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत करू लागलो. थोड्यावेळात ती ही शांत झाली. अजूनही पूर्ण राउत हॉटेलमधली लोक टाळ्या वाजवत होते. लग्नानंतरचे हे सर्वात पहिले सर्प्राइज़ होते..... :)

रोल नंबर ४३
No comments:
Post a Comment